entertainment news – बॉलीवूड किंग शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत आहे. जगभरात जवानाने 850 कोटी रुपये कलेक्शन केले.
तसेच हा चित्रपट लवकरच तो 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले. शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. जवानला ऑस्करसाठी पाठवा, असेही ते म्हणाले.
‘तीन वर्षांपूर्वी 2020 मध्ये एटली कुमार ने शाहरुखला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली होती. पण आमची भेट 2019 साली झाली, म्हणजे जवळपास 5 वर्षे झाली. एटली कुमार नेचित्रपटाची स्क्रिप्ट शाहरुखला झूम कॉलद्वारे सांगितली. एटली कुमार ने असे कधीच कोणाला सांगितले नव्हते, पण त्यावेळी लॉकडाऊन झूम कॉल हाच योग्य पर्याय होता, त्यामुळे मी गोष्टी सामान्य होण्याची वाट पाहिली नाही.
गौरीला स्क्रिप्ट आवडली
एटली कुमार ने शाहरुख खानला विचारले, सर तुम्ही आता हे करू शकता का? शाहरुख खान म्हणाला, आपण फ्री असाल तेव्हा भेटूया. मग एटली कुमार ने झूम कॉलद्वारे या चित्रपटाच्या स्क्रिप्ट विषयी चर्चा केली. एक विशेष क्षण होता. चित्रपटाची कथा सांगण्यासाठी साडेतीन तास लागले. शाहरुख खान म्हणाला स्क्रिप्ट खूप छान आहे. यावर काम करूया. गौरी मॅडमनाही ते आवडले आणि आम्ही त्यावर काम करू लागलो. 2019 साली शाहरुख खानने मला ही मोठी संधी दिली. मी त्यावेळी बिगिल पूर्ण करत होतो. मी पहिल्या दिवसापासून शाहरुख खान सरांसोबत जवानमध्ये काम करत होतो.’
ऑस्करसाठी पाठवेल
ऍटली यांना ऑस्करबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘जवाननेही ऑस्करसाठी जायला हवे. मला वाटतं, सिनेमासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाची, प्रत्येक दिग्दर्शकाची, तंत्रज्ञांची नजर गोल्डन ग्लोब, ऑस्कर आणि राष्ट्रीय पुरस्कारावर असते. मलाही त्या जवानला ऑस्करमध्ये पाठवायचे आहे. बघूया, खान सरांनी ही मुलाखत बघावी आणि वाचावी असे वाटते. मी फोन करून सरांना विचारेन की, हा चित्रपट ऑस्करसाठी घ्यावा का? असाही मोकळेपणाने ऍटली मीडियाशी संवाद साधला आहे.