Entertainment : ‘मिर्झापूर’ वेबसिरीजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता विक्रांत मेस्सीच्या लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे. मिर्झापूरमध्ये त्याने बबलू पंडितची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. मात्र आता विक्रांत मेस्सीची पत्नी शीतल ठाकूर गर्भवती असून लवकरच ती आई होणार असल्याची चर्चा होत आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी विक्रांत मेस्सीची बायको शीतल ठाकूरचा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी ती गरोदर असल्याचा अंदाज लावला होता. त्यानंतर आता मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की विक्रांत आणि शीतल लवकरच आई-बाबा होणार आहेत. एका वृत्तानुसार, लवकरच विक्रांत आणि शीतलच्या आयुष्यात नवा पाहूणा येणार आहे. हे दोघेही याबद्दल खूप उत्सुक आहेत. मात्र, अद्याप याबाबत दोघांनीही कोणताही खुलासा केलेला नाही.
त्यामुळे खरचं त्यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार की हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, शीतल आणि विक्रांत मेस्सी 2015 पासून एकमेकांना डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2022 ला म्हणजेच गेल्या वर्षी 18 फेब्रुवारीला दोघांचे लग्न झाले होते. केवळ कुटुंबातील सदस्य, आणि जवळचे मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केले होते. लग्नाचे फोटो शेअर करत या दोघांनी ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली होती.
लग्नाच्या बाबतीत देखील या दोघांनी कमालीची गुप्तता ठेवली होती. त्यानंतर आता बाळाच्या बाबतीत ही त्यांनी कोणतीही अधिकृतरित्या माहिती सांगितलेली नाही. विक्रांत मेस्सीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, विक्रांत 12वी फेल, सेक्टर 36 आणि हसीन दिलरुबा 2 या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.