ENTERTAINMENT । दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील त्याच्या गाण्यांनी आणि डायलॉगने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. या चित्रपटाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर ता ‘पुष्पा 2: द रुल या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
सध्या या चित्रपटाबाबत विविध अपडेट समोर येत आहेत. यातच आता ‘पुष्पा 2: द रुल’ साठी अल्लू अर्जुन या चित्रपटासाठी मानधन घेणार असल्याची चर्चा असली तरी अशी माहिती समोर येत आहे की, या चित्रपटासाठी सध्या तो मोफत काम करणार असून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो कोट्यावधीची कमाई करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2: द रुल’साठी कोणतेही मानधन घेण्यास नकार दिला असला तरी तो चित्रपटाने केलेल्या एकूण कमाईतून 33 टक्के हिस्सा घेणार आहे.
तर इतर चित्रपटांसाठी ‘पुष्पा 2’ रिलीज होण्यापूर्वीच अभिनेत्याने आपली फी वाढवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने त्याच्या फीमध्ये 30 टक्के वाढ केली आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर तो आतापर्यंत 100 कोटी रुपये घेत होता पण फी वाढवल्यानंतर आता तो 150 कोटी रुपये घेत आहे.
रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा द रुल’मध्ये पुन्हा एकदा अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. या दोघांच्या लग्नमंडपातून पुष्पा द राइज झाला. याशिवाय फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्पा द राइज यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच १५ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हे वाचले का ? श्रुती हासन – शंतनूचे झाले ‘ब्रेकअप’