दिल्ली – राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता निवडणुकीला जोर चढण्यास सुरुवात झाली आहे. 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारी रोजी निकाल लागतील.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी दिल्लीत काँग्रेस आणि भाजपकडून मोठी रणनीती आखण्यात येत आहे.
केजरीवाल यांच्या मतदार संघात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कन्या ‘लतिका दीक्षित’ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
तर भाजपकडून माजी केंद्रीय विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या ‘बासुरी स्वराज’ यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक केजरीवाल यांच्यासाठी अवघड जाणार असल्याचे दिसून येत.