बंद कारखान्यांबाबत सत्ताधारी गप्प का?

संजय जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार सुळेंचा सवाल

खळद – जेजुरीच्या एमआयडीसीमध्ये 75 टक्‍के कारखाने बंद आहेत यावर सत्ताधारी बोलत नाहीत. त्यामुळे केवळ विकासाच्या नावाखाली खोट्या थापा मारून कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या आमदारांना पुन्हा निवडून देणार का? असा जाहीर सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित करून राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवरी (ता. पुरंदर) येथे महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार सुळे यांनी महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर कडाडून टीका
केली.

याप्रसंगी हरी सणस, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, विजयराव कोलते, जिल्हा बॅंकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, दत्तात्रय झुरंगे, सुनिता कोलते, शिवाजी पोमण, हेमंत कुमार माहुरकर, सोनाली यादव, संजय चव्हाण, नंदकुमार जगताप, गौरी कुंजीर, भारती शेवाळे, ऋतुजा धुमाळ, मार्तंड भोंडे, बाळासाहेब कामथे, जयदीप बारभाई, गणेश जगताप, बबनराव टकले, राहुल गिरमे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय जगताप म्हणाले की, राज्यमंत्री शिवतारे यांनी गुंजवणी धरणाचे काय झाले याचे जाहीर उत्तर द्यावे. 10 वर्षांत पुरंदर उपसाच्या पाण्यावर साधा फिल्टर प्लांट बसविता आला नाही. तालुक्‍याची वेगळी ओळख असताना भ्रष्टाचारी तालुका म्हणून ओळख केली. त्यामुळे अशा व्यक्तींना आता मुंबईचा रस्ता दाखविण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here