साठ्याची चौकशी करताच भाजपला घाम का फुटतो ? : नवाब मलिक

मुंबई  – रेमडेसिविर औषधांचा साठा कोणाकडे आहे हे समजल्यास पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी त्यांना चौकशीसाठी बोलावतात. त्यावेळी त्यांना सोडवण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्ष नेते पोलिसांवर दबाव आण्यासाठी का धावून जातात? त्यांना कशाची भीती वाटते? त्यांनी या संबंधाचा खुलासा करावा असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांच्या पलटवारामुळे भअरतीय जनता पक्ष आणि राज्य सरकारमधील रेडमेसिविर पुरवठ्‌याचे राजकारण चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

पोलिसांना निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती, त्याचवेळी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वणज रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. डोकनिया यांना केवळ साठ्याबाबतची चौकशी करण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला नव्हता. मग केवळ चौकशी करतानाही राज्यातील भाजपाचे दिग्गज नेते का घाबरले? असा सवालही त्यांनी केला.

या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? राज्याला साठा मिळू नये म्हणून भाजपाचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. उपलव्ध साठा विकत घेऊन आपण परस्पर विकू, अशी त्यांचू भूमिका असावी, असा संशय आहे. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका ते घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात? हा खरा प्रश्न आहे, असे अनेक सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केले.

देशामध्ये सात कंपन्यांना देशांतर्गंत वाटप आणि विक्रीची परवानगी आहे. दोन कंपन्यांना पदरेशात विक्रीची परवानगी आहे. त्याउलट 17 कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध असून राज्य सरकारकडे विक्रीची परवानगी मागत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ट्विट करुन 50 हजारांचा साठा आम्ही वाटणार आहे सांगता. पण सरकार मागते तेव्हा ते देत नाही, मग त्यांच्या मागे काय राजकारण आहे हे भाजपाने स्पष्ट केले पाहिजे. ज्यांनी साठा ठेवला त्यांना चौकशीसाठी बोलावले आणि नंतर भाजपा नेते वकिलीसाठी पोलीस ठाण्यात जातात हे योग्य नाही. हे त्यांना शोभत नाही. विरोधी पक्षनेता फोनवरुन माहिती घेऊ शकतो, वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते. पोलीस ठाण्यात जाऊन वकिली करण्यात काय राजकारण आहे हे माहिती नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

चौकट
खुलासा करा
काळा बाजार रोखण्यासाठीपोलीस यंत्रणा काम करत आहे. पण डोकानिया चौकशीसाठी आल्यानंतर राज्यातील भाजपाला घाम का फुटलो? वकिलीसाठी भाजपा नेते का जात आहेत? त्यांची बाजू फडणवीस वकील मांडत होते की त्यांचे संबंध आहेत म्हणून मांडत होते? राज्याच्या हितासाठी पोलीस यंत्रणा, एफडीए काम करत असेल आणि चौकशीसाठी कोणाला बोलावले तर भाजपाचे प्रमुख नेते तिकडे जातात यावरुन त्यांच्यात काय संबंध आहेत याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.