झारखंडमध्ये लष्कराची मदत घ्यावी लागेल – सोरेन

रांची – झारखंडमधील करोनाची स्थितीही अत्यंत गंभीर बनत चालली असून, आम्हाला आता येथे कोविड मदतीसाठी लष्करी मनुष्यबळ वापरण्याची वेळ येऊ शकते, असे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला राज्यात रेमडेसिविर औषधांची मोठी कमतरता भासत आहे.

केंद्राने त्यासाठी आवश्‍यक ती मदत त्वरित करण्याची गरज आहे. राज्यातील लोकांना करोना स्थितीचे अजूनही गांभीर्य आलेले नाही असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की मी राज्याच्या काही भागाचा दौरा करून आलो; पण अजूनही लोकांना साधा मास्क वापरण्याचेही गांभीर्य आलेले दिसले नाही. राज्यातील करोना रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजारांवर गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.