IPL 2021 : शिखर धवनचं झंझावाती अर्धशतक; दिल्लीचा पंजाबवर रोमांचक विजय

मुंबई – शिखर धवनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज किंग्स इलेव्हन पंजाब संघावर  ६ गडी राखून रोमांचक विजय मिळवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर दिल्ली संघाने १८.२ षटकांत ४ बाद १९८ धावा करून विजयाची नोंद केली. शिखर धवनने ४९ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या.

विजयासाठीच्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि धवन यांनी ५९ धावांची सलामी दिली. शॉ १७ चेंडूंत ३२ धावा करून बाद झाला. मात्र धवनने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. धनव बाद झाल्यानंतर पंत आणि मार्कस स्टॉयनिस यांनी झुंज दिली. मात्र पंत  दिल्लीचा विजय साकार केला. तर पंतने १५ धावा करून माघारी परतली. त्यानंतर स्टॉयनिसने नाबाद २७ तर ललित यादवने नाबाद १२ धावा करत दिल्लीचा विजय साकार केला.

तत्पूर्वी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पंजाबच्या डावाची दमदार सुरुवात केली. या दोघांनी 2 षटकात 25 धावा केल्या. दिल्लीसाठी पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज लुकमान मेरीवालाच्या पहिल्या षटकात तब्बल 20 धावा वसुल केल्या. मागील काही सामन्यात फ्लॉप ठरलेल्या मयंकनेही सुंदर फटके खेळत संघाची धावसंख्या वाढवली. पॉवरप्लेच्या 6 षटकात या दोघांनी 59 धावा उभारल्या. त्यानंतर मयंकने अर्धशतक साकारले. 10 षटकात पंजाबने बिनबाद 94 धावा उभारल्या. 13व्या षटकात दिल्लीला पहिले यश मिळाले. मेरीवालाने स्थिरावलेल्या मयंकला बाद केले. मयंकने 36 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 69 धावांची खेळी केली. मयंक-राहुलने पंजाबसाठी 122 धावांची भागीदारी उभारली.

तो बाद झाल्यानंतर केएल राहुलनेही आपली अर्धशतकी खेळी केली. त्याने 45 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. त्यामुळे पंजाबने 14 षटकात 1 बाद 128 धावांपर्यत मजल मारली. त्यानंतर रबाडाच्या गोलंदाजीवर केएल राहुल झेलबाद झाला. त्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार खेचत 61 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्रिस गेलही 11 धावांत परतला. अखेरच्या षटकांमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांनी वापसी करत पंजाबला दोनशेचा टप्पा गाठण्यापासून रोखले. दिपक हुडा 22 धावांवर, तर शाहरुख खान 15 धावांवर नाबाद राहिले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.