नवी दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत सुरू असलेली लढाई अजून संपलेली नाही. शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय होणे बाकी असून,
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय पीठासमोर उद्या, सोमवारी ही सुनावणी (Supreme Court) होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचेही लक्ष आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे, तर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाचा निवाडा निवडणूक आयोगाला सोडवायचा होता.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय 17 फेब्रुवारीला घेतला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी निकाल दिला होता.
या निकालात सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली होती. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे.
दरम्यान, 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे गटाने आयोगाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.
मात्र उद्धव ठाकरे गटाला विश्वास आहे की, सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द, ठरवणार आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हालाच देणार.
त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावेळी सर्वोच्च न्यायालयानेच केलेल्या निरीक्षणांचा हवाला दिला आहे. 11 मेला सत्तासंघर्षाच्या निकालात सुर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे काही मुद्दे खोडून काढले होते