मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. अशातच मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने “नमो 11′ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11 कलमी कार्यक्रमाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच, जाहीर करण्यात आलेल्या सर्व कामांवर आमचे लक्ष असणार असून, याबाबत नियोजन अंमलबजावणी चोख असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
असा आहे ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रम
महिलांना शासकीय योजनेचा लाभ : चाळीस लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडणे.
नमो कामगार कल्याण अभियान : 73 हजार बांधवांना कामगारांना सुरक्षा संच देत भारत उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान.
नमो शेततळी अभियान : शेतकऱ्याचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढवणे.
नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियान : आत्मनिर्भर गाव विकसित करणे. शंभर टक्के बेघरांना पक्के घर बांधून देणे.
नमो ग्रामसचिवाले अभियान : प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायती कार्यालयाचे बांधकाम करणे. पूर्णपणे सौरऊर्जेचा वापर होईल यासाठी नियोजन करणे.
नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान : 73 आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी, सुधारणा करणे आणि 73 विज्ञान केंद्र उभारणे.
नमो दिव्यांग शक्ती अभियान : 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारूण दिव्यांगांचे सर्वेक्षण आणि ओळख निश्चित करणे.
नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान : 73 क्रीडा संकुल व सुसज्य क्रीडा मैदाने उभारणे.
नमो शहर सौंदर्य करण अभियान : 73 ठिकाणी शहर सौंदर्यकरण प्रकल्प राबवणे.
नमो तीर्थस्थळे व गडकिल्ले संरक्षण कार्यक्रम : 73 पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांची व गडकिल्ल्यांची सुधारणा करणे.
नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान : 73 गरीब व मागासवर्गीय वस्त्यांना सर्वांगीण विकास करणे.