सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीचा कोण आहे मालक?

मुंबई – सचिन वाझे प्रकरणात वेगवेगळे खुलासे समोर येत आहे. विरोधक सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या बैठकावर बैठका सुरु आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणात  राष्ट्रीय तपास यंत्रणेने  मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला असून मुंबई पोलिसांच्या विभागातील अधिकाऱ्यांची त्यांनी चौकशी केली.  या स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे  यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे.  या गाडी -सोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत  यांनी केला आहे.

या प्रकरणात  मर्सिडीज गाडीचा मालक कोण अशी चर्चा सुरु आहे. ही मर्सिडीज कोणाची असा प्रश्न निर्माण झाला असताना या मर्सिडीजचे मालक स्वत: समोर आले आहे. उद्योजक सारांश भावसार यांची ही गाडी आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,‘सचिन वाझे प्रकरणामधील मर्सडीज गाडी माझीच होती. परंतू ती गाडी मी फेब्रुवारी मधेच car24 या online कंपनी ला विकली होती.’ 

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत या गाडी सोबतचे भाजप नेत्याचे फोटो शेअर केले आहे.  त्यांनी ट्विट केले आहे की,’17 ऑक्टोबर 2020 रोजी देवेन शेळके यांची ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली. मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांची खुलासा करावा असं म्हणत त्यांनी मर्सिडीज गाडीचा फोटो ही शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘एनआयए’च्या पथकाने  जप्त  केलेल्या मर्सिडीज गाडी सोबत देवेन शेळके आहे. सध्या सोशलवर या फोटोंमुळे या प्रकणात भाजप कनेक्शन असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.