मुंबई – अंबानी यांच्या निवासस्थानाजवळून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घालून चालत आहे. ती व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा खुलासा एनआयएने केला आहे.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घालून अँटिलियाच्या बाहेरून जात असल्याचे दिसत आहे. मात्र, सचिन वाझे यांनी पीपीई किट घातलेलं नव्हतं. एनआयएला तपासात मिळालेल्या माहितीनुसार, तो पीपीई किट नव्हता, तर तो पांढरा कुर्ता होता. याप्रकरणात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केल्यावर एनआयएच्या निदर्शनास ही बाब आली.
In the CCTV footage, Sachin Waze could be seen with his head covered with a large handkerchief so that no one could identify him. He was wearing an oversized kurta-pajama, and not PPE coverall, in an attempt to mask his body language & face: National Investigation Agency (NIA)
— ANI (@ANI) March 17, 2021
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराभोवती सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणातएनआयने मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला. या विभागातील अधिकाऱ्यांची त्यांनी चौकशी केली. एनआयएने तेथून वाझे यांचे लॅपटॉप, आय पॅड आणि मोबाईल फोन तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली ही झाडाझडती, मंगळवारी पाहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. सहाय्यक पोलिस आयुक्तांसह काही अधिकाऱ्यांचे जबाबही एनआयएने घेतले. या कार्यालयातील सहायक पोलिस निरीक्षक रियाझुद्दिन काझी याची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली.