उष्मा वाढल्याने उत्तराखंडमधील विविध ठिकाणच्या जंगलात आग लागली. अशात नैनिताल येथील हायकोर्ट कॉलनीजवळील जंगलात सुद्धा ही आग दिसून आली आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील जंगलात आग लावणाऱ्या तिघांना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे
मागील २४ तासांत विविध ठिकाणी जंगलाला आग लागण्याच्या ३१ नवीन घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये ३३.३४ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले आहे. जंगलातील आगीच्या वाढत्या कहराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सर्व विभागांशी समन्वय साधून ते रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.
#WATCH नैनीताल, उत्तराखंड: नैनीताल के जंगल में लगी आग बुझाने के लिए भारतीय वायु सेना ने MI-17 हेलीकॉप्टर से पानी का छिड़काव किया। pic.twitter.com/YG6SWxqBxx
— ANI_HindiNews (@AHindinews) April 27, 2024
नैनिताल जिल्हा मुख्यालयाजवळील जंगलात लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. या आगीमुळे पाइन्स परिसरात असलेल्या हायकोर्ट कॉलनीलाही धोका निर्माण झाला आहे. परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह लष्कराचे जवानही प्रयत्न करत असून आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्याचेही प्रयत्न सुरू आहे.
येथील वनविभागाने जारी केलेल्या दैनंदिन बुलेटिननुसार, राज्यात गेल्या २४ तासांत कुमाऊं भागात जंगलाला आग लागण्याच्या २६ घटना घडल्या, तर गढवाल प्रदेशात ५ घटना घडल्या, ज्यामध्ये ३३.३४ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले. . या घटनांमध्ये 39,440 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरपासून आतापर्यंत राज्यात जंगलाला आग लागण्याच्या एकूण 575 घटना घडल्या असून यामध्ये 689.89 हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले असून 14,41,771 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
हे वाचले का मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, CRPF च्या हल्लेखोरांवर हल्ला, 2 जवान शहीद