पुणे – सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बंगळुरूमध्ये एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची रॅली झाली होती. या रॅलीत अमूल्या नावाच्या मुलीने ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. यावेळचा फोटो पुण्यात एका होर्डिंगवर आक्षेपार्ह मजकुरासह झळकला आहे.
अमूल्याचा घोषणा देतानाच्या सभेतील फोटोसह पुण्यात होर्डिंग लावण्यात आले आहे. यावर ‘जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान’, असा मजकूर लिहिला आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या चौकात हे होर्डिंग लावण्यात आले आहे. निखिल पवार यांनी या होर्डिंगचा फोटो पुणे पोलिसांना ट्विट केला. यानंतर हा फोटो व्हायरल झाला आहे.
पुण्यातल्या SP कॉलेज चौकातला हा बॅनर .
मेट्रो शहरात उघड उघड असे “कब्रस्तानात” धाडण्याचे बॅनर लागायला आपलं काय तालिबानी राज्य आहे का? हे द्वेषाचं विष महाराष्ट्रात पसरू देऊ नका. ???@CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @AjitPawarSpeaks @rajuparulekar @MaxMaharashtra @LoksattaLive pic.twitter.com/KT4Dcx4k79— Nikhil Pawar (@pawarnikhil100) February 29, 2020
पुणे पोलिसांनीही ट्विटची दखल घेतली आहे. तुमची तक्रार मिळाली आहे. आम्ही हे प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याकडं वर्ग करत आहोत. संबंधित पोलीस याची चौकशी करून आवश्यक कारवाई करतील, असे पुणे पोलिसांनी म्हंटले आहे.
Sir, we have got your complaint, we have forwarded it to the concern police station, and they will check and take the necessary action.
— PUNE POLICE (@PuneCityPolice) February 29, 2020