कोण आहेत नवनीत कौर राणा? पवारांनी घेतली शाळा

नवी दिल्ली: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात राज्यासह दिल्लीतही मोठ्या घडामोडी घडत असल्याचे प-पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगानेच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बैठकीत काय झाले याची सर्वानाच उत्सुकता लागली होती, परंतु यावेळी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, सत्तास्थापनेबाबत आम्ही चर्चाच केलेली नसल्याचे सांगितले.

तसेच अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे म्हटले आहे. याविषयी पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता, कोण आहेत नवनीत कौर राणा? त्या आमच्या पार्टीचे धोरण ठरवणार का? असे सांगत शरद पवार यांनी नवनीत कौर राणा यांची शाळा घेतली.

 

Ads

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here