नवी दिल्ली: केंद्र सरकारने काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयाच्या विरोधात पीडीपी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शने केली. या पक्षाच्या दोन खासदारांनी हातात फलक घेऊन तेथे ही घोषणाबाजी केली.
काश्मीरातील स्थिती सुरळीत करा, केंद्रशासित प्रदेश आम्ही मान्य करणार नाही अशा आशयाच्या घोषणा त्यांच्या फलकांवर लिहील्या होत्या. या पक्षाच्या दोन खासदारांनी संसदेच्या गेल्या आधिवेशनाच्या काळात कलम 370 विषयीचा प्रस्ताव सरकारने मांडल्यानंतर संसदेत घटनेची प्रत फाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सभापतींनी त्यांना त्यांच्या वर्तणुकीबद्दल तंबीही दिली होती. पीडीपीचे अन्य नेते सध्या स्थानबद्ध असून पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्तीही 5 ऑगस्ट पासून स्थानबद्ध आहेत.