बारामती – बारामती कोणी उभी केली हे जरा अंतर्मनाला विचारा असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाला नाव न घेता केला.
बारामती येथे खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका करीत असल्याने लोकसभा निवडणुकीत यावर आरोप- प्रत्यारोप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
विकासकामांचा संदर्भ देत पवार म्हणाले की, मी जेवढी विकासकामे बारामतीत केली आहेत. तेवढी विकासकामे यापुढील काळात कोणताही आमदार करू शकणार नाही.
शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले काहींनी अध्यक्षांची नेमणूक केली आहे. तालुका व शहरचे अध्यक्ष वकील आहेत. मात्र, काम कोण करतो, हे जनतेला सर्व माहित आहे. काही नग असे आहेत. इकडे तिकडे करीत आहेत. काहींचे कान भरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असाही त्यांनी आरोप केला.