दिल्ली जळत असताना, गृहमंत्री अमित शहा कुठे होते?

मुंबई – दिल्लीत झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्यांपैकी किमान जण गोळीबारात जखमी झाले आहेत, तर एका व्यक्तीचा मृत्यू त्याला पेतवल्याने झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीजळत आहे याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून भाजप पक्षासह गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत ‘गृहमंत्री, कुठे आहात?’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाहयांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून सडेतोड टीका करण्यात आली आहे. राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत. चिंता वाटावी असा हा प्रकार आहे! दिल्ली जळत असताना, आक्रोश करीत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते? काय करीत होते? असे प्रश्न विचारले जात आहेतअसंही सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख
राष्ट्रवादाचा उन्माद आणि धर्मांधतेचा मस्तवालपणा या दोन्ही प्रवृत्ती देशाला तीनशे वर्षे मागे ढकलत आहेत. भडकाऊ भाषणे हेच राजकारणाचे भांडवल झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळत आहे, पण भडकाऊ भाषणांचे भांडवल आणि त्यांचा बाजार जोरात आहे. केंद्रातले एक मंत्री अनुराग ठाकूर , खासदार परवेश वर्मा व कपिल मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता दिल्ली हायकोर्टाने दिले. ज्यांनी हे आदेश दिले त्या न्यायमूर्तींनाच सरकारने शिक्षा ठोठावली. वीर सावरकरांच्या गौरवासाठी जे राजकीय नौटंकी करीत आहेत त्यांनी देशाच्या गौरवाचा विचार करावा. राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत चिंता वाटावी असा हा प्रकार आहे ! दिल्ली जळत असताना, आक्रोश करीत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते? काय करीत होते? असे प्रश्न विचारले जात आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.