“कोरोना’मुळे शेअर बाजारा गडगडला

मुंबई – “कोरोना’ विषाणू उद्रेकाचा विपरीत परिणाम जगभरातील उद्योग जगतावर होताना दिसत असून त्यामुळे शेअर बाजारालाही घरघर लागली आहे. गेल्या आठवड्यात चीनमधील शेअरबाजाराने गेल्या 13 वर्षांमधील नीचांकी पातळी गाठली तर आज कोरोना व्हायरसमुळे रोखे बाजाराला गडगडला असून सेन्सेक्‍स तब्बल 1200 अंकानी पडला आहे.

दरम्यान, तेलाच्या किमतीही आज सहाव्या दिवशी घसरल्या आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. चीनव्यतिरिक्त इतर देशांमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला असून जागतिक बाजारात मागणी कमी झाल्यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.