राजकारणातील शुचिता केव्हा येणार? (भाग-१)

लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पण निकालानंतर संसद सदस्यांची जी स्थिती समोर आली ती आश्‍चर्यकारक आहेच पण चिंतित करणारीही आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकीत एकूण 233 संसद सदस्य जे निवडणूक जिंकले आहेत त्यांच्यावर गुन्हेगारी खटले नोंदले गेले आहेत. थोडक्‍यात काय तर हे निकाल म्हणजे जनतेमध्ये जागरूकता किती कमी आहे त्याचे उदाहरण आहे असे म्हणता येईल.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारवर भरवसा टाकला आहे; पण ज्या उमेदवारांना निवडून संसदेवर पाठवले आहे त्यात करोडपती उमेदवारांबरोबरच गुन्हेगारी खटले असलेल्या उमेदवारांची संख्या पहिल्यापेक्षा जास्त आहे. निवडणुकीच्या निकालांबरोबर जी परिस्थिती समोर आली आहे ती धक्‍कादायक आहेच पण चिंता वाढवणारीही आहे.

निवडणूक जिंकणाऱ्या खासदारांपैकी 475 खासदार कोट्यधीश आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ छिंदवाडा मधून खासदार म्हणून निवडून आला तो सर्वात श्रीमंत संसद सदस्य आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेने एक यादीच जाहीर केली आहे. त्यानुसार भाजपच्या 301 खासदारांपैकी 265 म्हणजेच 88 टक्के खासदार हे कोट्यधीश आहेत. एनडीए मध्ये सामील असलेल्या शिवसेनेचे सर्व 18 विजयी खासदार हे कोट्यधीश आहेत. कॉंग्रेसचे 51 खासदारांपैकी 43 सांसद कोट्यधीश आहेत.

राजकारणातील शुचिता केव्हा येणार? (भाग-२)

2014 मध्ये आकाराला आलेली सोळावी लोकसभा ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत श्रीमंत किंवा रईस खासदार निवडले जाण्याची साक्षीदार राहिली. या सोळाव्या लोकसभेमध्ये तब्बल 82 टक्‍के खासदार कोट्यधीश होते. यामध्ये तेलगू देसम पार्टी, टीआरएस आणि वायएसआर कॉंग्रेस या तीन पक्षांच्या खासदारांची सरासरी मालमत्ता 50 कोटींहून अधिक होती. 2014 मधील पाच सर्वांत धनाढ्य खासदारांमध्ये पहिले नाव होते तेलगू देसम पार्टीच्या जयदेव गल्ला यांचे. आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या या खासदार महाशयांची अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली मालमत्ता होती 683.05 कोटी रुपये. या यादीमध्ये दुसरे नाव होते टीआरएस पक्षाचे खासदार के. व्ही. रेड्डी. तेलंगणामधील चेवला लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या रेड्डी महाशयांची मालमत्ता होती 528 कोटी रुपये. तिसऱ्या स्थानावर होते भारतीय जनता पक्षाचे खासदार जी. गंगा राजू. आंध्र प्रदेशातील नरसापुरम लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवलेल्या या खासदारांची मालमत्ता होती 288 कोटी रुपये. चौथ्या स्थानावर आहेत वायएसआर कॉंग्रेसच्या बी. रेणुका. आंध्र प्रदेशातील कुर्नूल लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार रेणुका यांची मालमत्ता होती 242 कोटी रुपये. सर्वांत श्रीमंत खासदारांमध्ये मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या कमलनाथ यांचा क्रमांक पाचवा आहे. छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची अधिकृत घोषित मालमत्ता 206 कोटी रुपये इतकी होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.