नवी दिल्ली – मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण (Shivraj Singh Chavan) यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या आतापर्यंतच्या तीन याद्यातील 79 नावामध्ये नसल्यामुळे राजधानीत विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.
असे म्हटले जात आहे की, भाजपकडून शिवराजसिंह (Shivraj Singh Chavan) यांचे महत्त्व राजकीयदृष्ट्या कमी करण्यासाठी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू इच्छित नसल्याची चर्चा राजधानीत चांगलीच रंगली आहे.
त्यामुळे मध्य प्रदेश (Madhya pradesh) निवडणूकीचे तिकीट मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांना तिकीट केव्हा मिळणार?, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चीला जात आहे.
शिवाय भाजप नेत्यांच्या मते केंद्रीय मंत्री आणि खासदारांना यापूर्वी देखील विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसेच 2019 मध्ये माजी खासदार सुमित्रा महाजन यांच्यासोबत देखील असेच करण्यात आले होते.
त्यांचे नाव देखील एकाही यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले न्हवते. त्यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून आठवण देखील करून दिली होती. मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये देखील घडला होता.
भाजपने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात एकच नाव आहे. अमरवाडा मतदारसंघातून पक्षाने 33 वर्षीय मोनिका बत्ती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मध्य प्रदेश भाजपने आपल्या ट्विटर हॅंडलवरून ही माहिती दिली आहे. मोनिकांनी सात दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या आधी ऑल इंडिया गोंडवाना रिपब्लिक पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. मोनिका या माजी आमदार मनमोहन शाह बत्ती यांच्या कन्या आहेत.
याआधी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी सायंकाळी जाहीर केली. त्यात 39 उमेदवारांची नावे आहेत. विशेष म्हणजे या यादीत तीन केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना तिकीट देण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्र्यांमध्ये मुरेनाच्या दिमानी मतदारसंघातून नरेंद्र सिंह तोमर, नरसिंगपूरमधून प्रल्हाद पटेल आणि निवासमधून फग्गनसिंग कुलस्ते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 1 मधून तिकीट देण्यात आले आहे. 17 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या पहिल्या यादीतही भाजपने 39 नावांची घोषणा केली होती, त्यामुळे हा 39 चा आकडा चर्चेत आहे.