पुणे – गुरूवारी (दि. 28) अनंत चतुदशी आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिक लोक तर येतातच. पण, त्याचबरोबर राज्याच्या विविध भागातून नागरिक शहरात येत असत. या पार्श्वभूमीवर गाड्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे गाड्या लावता येणार आहेत.
पार्किंग व्यवस्था : न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग, शिवाजी आखाडा वाहनतळ, देसाई कॉलेज, हमालवाडा, पत्र्यामारुती चौकाजवळ, गोगटे प्रशाला, एसपी कॉलेजे, नदी पात्रा लगत, शिवाजी मराठा शाळा, नातूबाग, पीएमपी मैदानपूरम चौकाजवळ, पेशवे पार्क सारसबाग, हरजीवन हॉस्पिटल समोर सावरकर चौक, पाटील प्लाझा पार्किंग, मित्रमंडळ सभागृह, पर्वती ते दांडेकर पूल, दांडेकर पूल ते गणेशमळा, गणेशमळा ते राजाराम पूल, निलायम टॉकीज, विमलाबाई गरवारे हायस्कुल, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजिवनी मेडिकल कॉलेज मैदान, आपटे प्रशाला, फर्ग्युसन कॉलेज, जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान, मराठवाडा कॉलेज, एसएसपीएमएस कॉलेज येथे गाड्या लावता येणार आहेत.