संजय राऊतांच्या ट्विटला नवाब मलिक यांचे उत्तर
मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा आज निवडणुकांचा निकाल लागून महिना उलटून गेला तरी सुटलेला नाही. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत रोज नवनवीन वक्तव्य करत राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी ट्विटरचा आधार जास्त घेतला असल्याचे मागील काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. त्यातच आता ट्विटरवर संजय राऊतांच्या एका ट्विटला राष्टवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विटच्याच माध्यमातून उत्तर दिले आहे.
नवाब मलिक यांनी राहत इंदौरी यांच्या शायरीने संजय राऊत यांना रिप्लाय दिला आहे. संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावण्यासाठी एक ट्टिट केले होते त्यात, “तुमसे जो पहले वो जो एक शख्स यहॉं तख्त नशीं था, उसको भी अपने खुदा होने पे इतनाही यकीं था…”असे म्हटले होते. त्यांच्या याच ट्विटला नवाब मलिक यांनी उत्तर देत राहत इंदौरी यांच्या एक शेरने रिप्लाय दिला आहे.
त्यांनी, “जो आज साहिबे मसनद है कल नहीं होंगे, किराएदार है जाती मकान थोडी है…” असे म्हणत संजय राऊतांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. दरम्यान, राजयातील सत्ता स्थापनेचा तिढा 25 तारखेच्या आसपास सुटणार असल्याचे नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.