मुंबई – शिवसेनेची 25 वर्षे युतीत सडली असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला.आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्व सोडले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
25 वर्षे त्यांना वाटले नाही की सडलो आणि दोन वर्षात त्यांना वारंवार साक्षात्कार होतोय. त्याचे कारण सत्ता असूनही जी घुसमट, जे वैफल्य बाहेर पडताना दिसत आहे.
25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? मुख्यमंत्री त्यांचा असूनही निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, याचे आत्मपरीक्षण करा. मग अस्वस्थता का आहे? सरकार असूनही आपली वाढ का होत नाही? भाजपवर तर परिणाम नाही.
राज्यातील सगळ्या निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर आहे. तुमच्याशिवाय आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत आणि तुम्ही चौथ्या नंबरवर आहात हे लक्षात घ्या, अशी टीका दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.