मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ते घरीच क्वारंटाईन असून त्यांची तब्येत उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी उपचार सुरु केले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
पुढे मलिक म्हणाले की, गेल्या दोन-चार दिवसांत जे लोक संपर्कात आले होते, त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
Hon’ble Sharad Pawar Saheb has tested positive for Covid.
All those who have met him in the past few days must get themselves tested.
All his engagements for the next 7 days stand cancelled— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 24, 2022
पुढील सात दिवस म्हणजे रविवारपर्यंतचे शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम आणि भेटीगाठी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर नवे वेळापत्रक जाहीर होईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.