Sunny Leone । अभिनेत्री सनी लिओनी तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे खास करून ओळखली जाते. सनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते मात्र यावेळी सनी पोलीस भरती परीक्षेमुळे चर्चेत आली आहे.
उत्तर प्रदेशातील पोलीस भरती परीक्षेचा आज दुसरा दिवस आहे. परीक्षेबाबत केलेल्या ठोस उपाययोजनांदरम्यान एक प्रकरण चर्चेत आहे. अभिनेत्री सनी लिओनीची यूपी पोलीस भरती परीक्षेत ‘एंट्री’ झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सनी लिओनीच्या नावाचे ॲडमिट कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
यूपी पोलीस भरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी शनिवारी पहिल्या शिफ्ट दरम्यान कन्नौज जिल्ह्यातील तिरवा येथे असलेल्या परीक्षा केंद्राच्या तपासणीदरम्यान ही बाब समोर आली आहे. परीक्षेदरम्यान जेव्हा सनी लिओनीच्या प्रवेशपत्राची माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, हे नाव किंवा हा प्रवेशपत्र क्रमांक असलेला एकही उमेदवार परीक्षा देण्यासाठी आला नाही, ही दिलासादायक बाब आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ॲडमिट कार्डमध्ये उमेदवाराचे नाव सनी लिओन, रोल नंबर 1575771, नोंदणी क्रमांक 12258574 आणि परीक्षा केंद्र क्रमांक 51010 आहे, परीक्षा केंद्राचे नाव श्रीमती सोनश्री मेमोरियल कॉलेज, तिरवा अशी नोंद आहे. कन्नौज जिल्ह्यात. असेही नमूद आहे. सध्या पोलीस प्रशासन याचा तपास करत आहे. सोशल मीडियावर पोलीस भरतीच्या पोस्टवरून चचते संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.
हेही वाचा
जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे निर्वाण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची आदरांजली