पठाणकोट: जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्या गावासाठी गावांच्या विकासासाठी काम करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य असते. मात्र याच कर्तव्याचा विसर पडलेल्या एका आमदाराला एका तरुणाने प्रश्न विचारल्याने त्याला सार्वजनिक ठिकाणीच आमदारांनी बेदम मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पठाणकोटच्या भोआ क्षेत्राचे आमदार जोगिंदर पाल यांनी पंजाबच्या पुन्हा एकदा आपल्या कृतीने वादात अडकले आहेत. गावासाठी काय केले, असा प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला आमदारांनी सगळ्यांसमोर बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात जोगिंदर पाल पोलिस आणि आपल्या कार्यकर्त्यांसह तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.
Joginder Pal, the @INCPunjab MLA from Bhoa assembly seat in Pathankot district, when asked by a young man about his performance in the last 4.5 years….this is how the MLA responded….@ndtv pic.twitter.com/p2AVSOtqjx
— Mohammad Ghazali (@ghazalimohammad) October 20, 2021
एका वृत्त वाहिनीने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ नवरात्रीदरम्यानचा आहे. आमदार जोगिंदर पाल हे गावातील कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत असताना एका व्यक्तीने त्यांना विचारले की, तुम्ही गावासाठी काय केले? यामुळे आमदार भडकले आणि त्यांनी व्यक्तीला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह पोलिस आणि काही कार्यकर्त्यांनीही त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली.
यादरम्यान इतर लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. कुणीही आमदार किंवा इतर लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळी गर्दीतील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ शूट करुन व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदारावर टीकेची झोड उठली आहे. आता पक्ष यावर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.