वाघोली – शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह कुटुंबियांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीचा निषेध मंगळवारी (दि.१९) सकाळी वाघोली येथे करण्यात आला.
वाघोलीतील महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे धमकी प्रकरणाचा जाहीर निषेध व्यक्त केला. शिरूर-हवेली मध्ये ठिकठीकाणी याप्रकरणी कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात असताना या घटनेचा छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आमदार अशोक पवार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना देण्यात आले.
यावेळी माजी सरपंच माणिकराव सातव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र सातव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रामदास दाभाडे,माजी सरपंच शिवदास उबाळे, संजय आप्पा सातव पाटील,राजेंद्र पायगुडे,युवराज दळवी, राजेंद्र तांबे,कमलाकर सातव पाटील, माजी उपसरपंच कैलास बापू सातव पाटील,माजी सरपंच जयश्री सातव पाटील, सरपंच वसुंधरा उबाळे, बाळासाहेब सातव सर,उपसरपंच महेंद्र भाडळे,संदीप दादा थोरात,संतोष हिरामण सातव पाटील, धर्मेंद्र सातव पाटील ,दत्तात्रय कटके,अशोक सातव ,विठ्ठल शिवरकर, सचिन काळे, योगेश सातव, सुनील जाधवराव, ज्योती पाचर्णे, किसन जाधवमहाराज, बाळासाहेब शिंदे,शामराव सातव पाटील, गणेश बाळासाहेब सातव,अतुल शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.