नीळकंठ ज्वेलर्स ही पुण्यातील लोकप्रिय आणि विश्वसनीय सुवर्णपरंपरा, जी सोनं आणि हिऱ्यांच्या अलंकारांमधील विस्तृत श्रेणी तुम्हांला बहाल करते. कोविड नंतरच्या काळात पुन्हा एकदा नवरात्र, दिवाळी आणि लग्नसराईच्या दागिने खरेदीची ग्राहकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नीळकंठ ज्वेलर्सने भव्य ज्वेलरी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच 7 ऑक्टोबर पासून सुरू झालेला हा भव्य महोत्सव दि. 7 नोव्हेंबरपर्यंत सुरू रहाणार आहे. या महोत्सवाला पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सर्व प्रकारच्या दागिन्यांसाठी नीळकंठ ज्वेलर्स ही पेढी पुण्यात सुप्रसिध्द ठरलेली आहे. सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या अप्रतिम कलाकृती इथे घडविण्यात येतात. नववधू असो किंवा गृहिणी, असंख्य परिवारांच्या आयुष्यातले अनेक क्षण नीळकंठ ज्वेलर्सने अक्षरशः सोनेरी केलेले आहेत. त्यामुळेच नीळकंठ ज्वेलर्सला आपला स्वतःचा असा एक मोठा ग्राहकवर्ग लाभलेला आहे. जो अत्यंत विश्वासाने, आवडीने व हौसेने दागिने खरेदीसाठी फक्त नीळकंठ ज्वेलर्समध्येच येतो. वर्षानुवर्षे सुरू असणारी ही ग्राहकसेवेची सुवर्णपरंपरा आजही आपल्या नावीन्यतेने लखलखत आहे.
नीळकंठ ज्वेलर्स हा ब्रॅंड सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी त्यांच्या आवडीचे दागिने उपलब्ध करून देणारा ठरलेला आहे. पारंपारिक, मॉडर्न, व्हिंटेज, कॉन्टेम्पररी, अँटिक व क्लासिक अशा विविध श्रेणींमधील दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज या ब्रॅंडने ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळेच दागिनेप्रेमींसाठी नीळकंठमध्ये जाणे ही एक सुवर्णसंधीच असते. अद्वितीय डिझाईन, नक्षीकाम व कलाकुसर असलेले दागिने पाहून येणाऱ्या प्रत्येकाचे मन मोहविते. त्याचबरोबर पारदर्शकता, विश्वासार्हता आणि चोख व्यवहारांद्वारे नीळकंठ ज्वेलर्स ग्राहकांशी असलेले सोनेरी नातेही जपते व अधिक फुलविते.
सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच ग्राहकांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊनच नीळकंठ ज्वेलर्समध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. लक्ष्मीरोडपासून जवळच नारायण पेठेमध्ये असलेल्या या शोरूममध्ये कोविड-19च्या सर्व सुरक्षामानकांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. या शोरूममधील सर्व स्टाफचे लसीकरण पूर्ण झाले असून ते आपल्या व येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सुसज्ज झाले आहेत.
दीड वर्षांच्या प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर तुम्ही जर येणाऱ्या उत्सवांमधून पुन्हा एकदा नव्या जीवनाचा शुभारंभ करणार असाल तर नीळकंठ ज्वेलर्स तुम्हांला ते सुवर्णक्षण पुन्हा प्रदान करण्यास उत्सुक आहेत. या महोत्सवात सादर केलेले इअररिंग्ज्, नेकलेस, पेंडंट्स, ब्रेसलेट्स, मंगळसूत्र आणि इतरही असंख्य दागिने तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील इतके अद्वितीय व नवीनतम ठरणारे आहेत. त्याच बरोबर या भव्य दागिने महोत्सवामध्ये चोख भावातील सोन्याच्या दागिन्यांसोबतच तुम्हांला घडणावळीवर 25% सूट घेण्याचा आनंदही नीळकंठ ज्वेलर्सद्वारे दिला जाणार आहे. आपल्या आवडीचे दागिने घेण्यासाठी इतक्या असंख्य व्हरायटीज आणि त्यामध्येही सवलतीचा लाभ म्हटल्यावर या महोत्सवाला भेट दिल्याशिवाय कोणीही राहू शकणार नाही.
कुंदनपासून सोन्यापर्यंत, पोल्की ते हिऱ्यांपर्यंत, कोंदणातील खड्यांपासून ते अमूल्य रत्नांपर्यंत, माणिक-नीलम अशा विविध रत्नांचा वापर करत नीळकंठ ज्वेलर्सने चमचमणारे सुंदर दागिने खास तुमच्यासाठी घडविलेले आहेत.
सर्वोत्तम ग्राहकसेवा आणि पाहुणचारामुळे तुमची इथली दागिने खरेदी अधिक आनंददायी ठरणार आहे. तुमच्या कुटुंबाच्या सोयीसाठी व्हॅले पार्किंगचीही व्यवस्था पूर्वीपासून आहे आणि आत्ताही तशीच सुरू आहे. तुम्ही दिवाळीसाठी हौसेने दागिने घेणार असाल किंवा लग्नसमारंभाच्या निमित्ताने नववधूसाठी मोठी खरेदी करणार असाल तर नीळकंठ ज्वेलर्सचा हा भव्य महोत्सव तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. तेव्हां 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत अवश्य भेट द्या आणि सर्वार्थाने सोनेरी उत्सव साजरा करा.