मंत्रिमंडळाच्या फेररचनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री-

पणजी – मंत्री मायकल लोबो यांनी गोवा राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर अकार्यक्षम मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्याबाबतचे मत व्यक्‍त केले होते.

यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लवकरच राज्यमंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, मायकल यांचे मत फेटाळत, राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्‍यता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नाकारली.

राज्याचे पर्यटनमंत्री हे अकार्यक्षम असून त्यांना काढून त्यांच्या जागी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांची वर्णी लावावी, असे मायकल म्हणाले होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी कोणत्याही मंत्र्याबरोबर चर्चा झालेली नाही असे सांगितले. मंत्रिमंडळ पुनर्रचनेची गरज नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर मायकल यांच्या विधानावर पलटवार करून मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा निर्णय पक्ष घेतो, कोणतेही मंत्री घेत नाही, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.