आता चार महिन्यांत रुग्ण क्षयरोगमुक्‍त

उपचारासाठी आधी सहा महिने लागत : "सक्‍सेस पेपर' जागतिक आरोग्य संघटनेकडे

पुणे – क्षयरोगावरील उपचार हे सहा महिन्यांवरून चार महिन्यांपर्यंत आणण्यात बी. जे. मेडिकलला यश आले आहे. चार महिन्यांच्या उपचारानंतर रुग्ण बरे होऊ शकतात.

त्यासंबंधिचे संशोधन आणि त्याचा “सक्‍सेस पेपर’ जागतिक आरोग्य संघटनेकडे (डब्लूएचओ) कडे पाठवला आहे. त्यांनी ते मान्य केल्यास त्याच्या गाइडलाइन्स संपूर्ण जगासाठी तयार होतील. ससून सर्वोपचार रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांनी याविषयी माहिती दिली.

कमी गंभीर क्षयरोगामध्ये सहा महिन्यांपर्यंत उपचार देण्यासंदर्भातील “डब्ल्यूएचओ’च्या गाइडलाइन्स आहेत. मात्र, बी. जे. मेडिकलमध्ये याविषयी संशोधन झाले. त्यामध्ये कमी गंभीर रुग्णांना चार महिन्यांचे उपचार देऊन त्यांचा क्षयरोग बरा करता येऊ शकतो. आणखी दोन महिने त्यांना औषध घेण्याची गरज पडणार नाही, असे डॉ. किणीकर म्हणाल्या.

संपूर्ण जगात सात ठिकाणी याच्या “ट्रायल्स’ झाल्या. यात दक्षिण आफ्रिकेत पाच, तर भारतात दोन ठिकाणी या “ट्रायल्स’ झाल्या. भारतात एक बी. जे.मध्ये, तर दुसरे चेन्नईमधील “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टीबी रिसर्च’ (नर्ट) यांच्याकडे ही “ट्रायल’ झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.