#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजचा गोलंदाजीचा निर्णय

नॉटिंगहॅम : विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन संघांदरम्यान होणार असून लागोपाठ दहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणारा पाकिस्तानचा संघ आजचा सामना जिंकून विजयी मार्गावर परतण्याच्या प्रयत्नात असून वेस्ट इंडिजचा संघ गत सामन्यातील आपला फॉर्म कायम राखत विश्‍वचषक अभियानाची विजयी सुरुवात करण्यास उत्सुक असणार आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा वेस्टइंडिज संघाच्या बाजूने लागला आहे. वेस्टइंडिजच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तान संघास फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.

पाकिस्तान संघ –

फ़ख़र ज़मान, इमाम-उल-हक, बाबर आज़म, हारिस सोहैल, सरफ़राज़ अहमद, मोहम्मद हफीज़, इमाद वसीम, शादाब ख़ान, हसन अली, वहाब रियाज, मोहम्मद आमिर

वेस्ट इंडीज संघ –

क्रिस गेल, शाइ होप, डैरेन ब्रावो, निकोलस पुरन, शिमरोन हेट्मेयर, जेसन होल्डर, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, ऐश्ले नर्स, शेल्डन कॉटरेल, ओशन थॉमस

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×