विकासदर 6.5 टक्‍के राहणार; चौथ्या तिमाहीबाबत देशातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्‍त केला अंदाज

नवी दिल्ली – सरलेले पूर्ण वर्ष विकासदरासाठी फारसे उत्साहवर्धक राहिलेले नाही. औद्योगिक उत्पादन, सेवा क्षेत्रातील उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील उत्पादन अपेक्षे इतके वाढलेले नाही. शुक्रवारी केंद्रीय सांख्यिकी विभाग चौथ्या तिमाहीच्या विकासदराची आकडेवारी जाहीर करणार आहे.चौथ्या विकासदर केवळ साडेसहा टक्के राहण्याची शक्‍यता असल्याचे अर्थतज्ज्ञांना वाटते.

फिक्‍की या उद्योजकांच्या संघटनेने या संबंधात देशातील निवडक अर्थतज्ज्ञांची चर्चा करून हा सर्वसाधारण अंदाज व्यक्त केलेला आहे. चालू आर्थिक वर्षासाठीचा विकासदर 7.1 टक्‍के राहील तर पुढील वर्षाचा विकासदर 7.2 टक्‍के राहील असे या तज्ज्ञांना वाटते. या वर्षात कृषी क्षेत्राचा विकासदर तीन टक्‍के तर औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा विकासदर अनुक्रमे 6.9 टक्के व 8 टक्के राहण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आलेली आहे. नव्या सरकारला या अंदाजापेक्षा जास्त विकासदर साध्य करण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

एक वर्ष तरी घाऊक आणि किरकोळ किमतीवरील महागाई नियंत्रणात राहण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र जागतिक व्यापारयुद्ध, क्रूड तेलाचे वाढत असलेले भाव पाहता चालू खात्यावरील तूट नियंत्रणात ठेवणे अवघड जाणार आहे. ही तूट 2.1 टक्‍क्‍यांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात आले. नव्या सरकारने आठ टक्केपेक्षा जास्त विकासदर साध्य करण्याचे सूचित केलेले आहे. मात्र असे करणे तितकेसे सोपे नाही असे त्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.