पुणे – सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज (10 डिसेंबर) पहाटे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आहेत. भिडे यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
सकाळी 9.30 वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत नरेंद्र भिडे यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
दरम्यान, नरेंद्र भिडे यांच्या निधनानंतर लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. “नरेंन्द्र भिडे .. माझा हक्काचा एकुलता एक संगीतकार गेला .. ऊन ऊन वठातून , आभाळा आभाळा , अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ आता पुन्हा होणे नाही .. तीन वर्षांपूर्वी त्याला ज्या दिवशी चाल सुचली तो दिवस..” असं तरडे म्हणाले.