पर्यावरण पूरक गणपती बनवा ; कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर – उत्सव साजरा करावा पण त्यापासून पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होऊ नये अशी मानसिकता समाजात चांगलीच रुजू लागली आहे त्यामुळे गणेशोत्सव आणि तोही पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातील गणेशभक्तांची धडपड सुरु असल्याचे चित्र शनिवारी-रविवारी पाहायला मिळाले.
पर्यावरण पूरक गणपती बनवाच्या कार्यशाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यशाळांमधून मुलांना शाडूमातीचे गोळे देण्यात आले आणि प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या शिल्पकाराच्या सांगण्या बरहुकूम मुलांनी त्या गोळ्यांना आकार दिला निर्गुण निराकार गोळ्यातून बघता-बघता सगुण साकार गणरायाच्या विविधाकृती मूर्ती निर्मिल्या गेल्या कोणाचा लंबोदर तर कोणाचा शुपकर्ण कोणाचा गणपती बासरी वाजवतो तर कोणाचा गणपती मोदकाचा आस्वाद घेतो.पण एक मात्र खरं कि ह्या कार्यशाळेतल्या प्रत्येकला मुला-मुलीच्या व त्याच्या आई-वडलांच्या चेहऱ्यावर नवनिर्मितीचा आनंद दिसत होता.
या गणपतीच्या मूर्ती वाळल्यानंतर त्यांना आकर्षक रंगसंगतीत रंगवण्यात आले ते रंगही पर्यावरणपूरक होते तर काही कार्यशाळांतून गणपती बसवण्यासाठी आकर्षक मखर बनविण्याचे प्रात्यक्षिकहि दाखविण्यात आले.एका ताटलीत कमळाच्या आकारात पाकळ्या कापून त्या फुलाच्या आकारात चिकटविण्यात आल्या आणि पाठीमागच्या बाजूला कागद दुमडून तयार करण्यात आलेला पंखा तयार करून चिकटविण्यात आला अश्या प्रकारे पर्यावरण पूरक गणपती बरोबरच आकर्षक मखरही तयार झाले.
माउली सभागृहाच्या तळमजल्यात सुजाता फाउंडेशनच्या कलारंग ऍकॅडमीच्या माध्यमातून सुजाता पायमोडे यांनी तर आय लव्ह नगरच्या माध्यमातून कलाश्री चे शुभंकर कांबळे यांनी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात अशोका गॅलरीच्या अशोक डोळसे यांनी ही इकोफ्रेंडली गनपती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या या कार्यशाळांना मिळालेल्या प्रतिसादावरून पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याची कल्पना समाजात चांगलीच रुजायला लागली आहे याचीच प्रचिती येते.
इकोफ्रेंडली गणपतीसह मखरही
इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळेत शाडुमातीच्या गोळ्यापासून गणपती तयार करण्या बरोबरच इकोफ्रेंडली मखरही तयार करून घेतली त्यासाठी लाकडापासून बनविलेल्या ताटल्या, सुवर्णवर्खी कागद आणि पेपर पासून बनविलेल्या पुंगळ्या देण्यात आल्या यासर्व वस्तू पर्यावरणपूरक आहेत.स्वतः बनविलेला गणपती बसवा
कलारंगच्या सुजाता पायमोडे यांनी गणापती बनवा कार्यशाळेसाठी मुलं-मुली त्यांचे पालकही मोठ्या प्रमाणावर येतात गणपती बनवितात मात्र त्याची स्थापना करीत नाहीत. त्यांना स्वतःतयार केलेला गणपती बसविण्यासाठी उद्युक्त करणे हे आव्हान समजून यंदा गणपती बरोबरच आकर्षक मखरही बनविण्यास शिकविलेजी मलं-मुली याच गणपतीची स्थापना करून त्याचंघरीच विसर्जन करतील त्यांना आकर्षक बक्षीस देण्याचे जाहिर केले.