व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या मंडळाचे परवाने रद्द करू

वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांचा इशारा :  व्यापाऱ्यांची निषेध सभा

पिंपरी – विविध सण तसेच इतर कार्यक्रमाच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या मंडळ तसेच इतर संस्थांचा परवाना रद्द करू, असा इशारा वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी दिला आहे. आठ दिवसांपूर्वी वर्गणी दिली नाही म्हणून म्हातोबानगर, वाकड येथील मुकेश चौधरी या व्यापाऱ्याच्या कुटुंबियांवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खुनी हल्ला केला होता.

या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड व्यापारी आघाडी व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने काळेवाडी येथे निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यापाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. या निषेध सभेला पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष चौधरी, सुधीरकुमार अगरवाल, प्रकाश भंडारी, चंदारामजी भायल, उमेश चौधरी यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…तर रामराज्य सुरू
असल्याचा समज होईल यावेळी बोलताना माने म्हणाले, “”व्यापाऱ्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा. जर तुम्ही काहीच तक्रारच केली नाही, तर आपल्याकडे रामराज्य सुरू असल्याचा आमचा समज होईल. व्यापाऱ्यांनी तक्रार केल्यास पोलीस निश्‍चितपणे संबंधितांवर कारवाई करतील. तसेच भविष्यात तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, याकडेही पोलीस लक्ष देतील.”

निवंगुणे म्हणाले, “”व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायप्रमाणेच एकता वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पोलीस अधिकारी वर्दीतील तर आपण बिनवर्दीचे पोलीस आहोत. त्यामुळे सर्व पोलिसांवर न ढकलता दक्ष आणि सतर्क राहून जबादारीने वागले पाहिजे. आम्ही वर्गणीला कधीच नाही म्हणत नाही, मात्र गुन्हेगारी मार्गाने खंडणी वसूल करणाऱ्यांना आमचा विरोध आहे.” निषेध सभेत व्यापाऱ्यांनी पीडित मुकेश चौधरी यांच्या उपचारासाठी जमा केलेली 16 हजार 750 रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केली. संघटनेचे उपाध्यक्ष सोमाराम राठोड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)