मतदान केले, पण कुणाला पडले!

मरकळ, सोळू, धानोरे परिसरातील मतदारांनी प्रात्यक्षिकाद्वारे अनुभवले

चिंबळी – एकाला मतदान केले तरी ते अन्य उमेदवाराला पडत असल्याच्या चर्चेला ब्रेक देण्यासाठी आपण ज्याला मतदान केलं; त्याची खात्री करण्यासाठी आता या पुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीनचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्याचे प्रात्यक्षिक मतदारांनी अनुभवले.

खेड तालुका पंचायत समिती महसूल अंतर्गत मरकळ, सोळा, धानोरे परिसरात आळंदी महसूल विभागामार्फत हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अरूण चौधरी, खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, तलाठी भाऊसाहेब बी. बी. पाटील, बी. आर. जाधव, व्ही. टी. नरवडे, एम. आर. ठाकूर, आर. बी. सुळ, सचिन रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केलेले मतदान त्याच उमेदवाराला नोंदविले गेले की दुसऱ्याच्या नावे गेले? मतदान यंत्रात काही बिघाड तर नाहीना? मतदान हॅक करता येते का ?मतदान यंत्र रिमोट कंट्रोलद्वारे बदलले तर जाणार नाही ना! असे अनेक प्रश्‍न मतदारांच्या मनात निर्माण होतात. त्याचे निरसन करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया पारदर्शी व निःपक्ष होण्यासाठी आता निवडणूक आयोग निवडणुकात व्हीव्हीपॅट मशीन वापर करण्यात येणार असून याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात असल्याचे मंडल अधिकारी चेतन चासकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.