मुंबई – गावागावात जत्रा सुरु झाल्यापासून नृत्यांगना गौतमी पाटील अधिकच चर्चेत आली आहे.नुकतंच गौतमीने पुण्यातील मुळशीमध्ये बैलांसमोर आपली अदाकारी सादर केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गौतमीच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात देखील होऊ लागल्याचं दिसून आलं होत. राज्याचे कूषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतंच गौतमी पाटीलबाबत विधान केलं आहे. सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेऊ आणि अजित पवारांनाही बोलावू असं सत्तार यावेळी म्हणाले आहेत.
पत्रकारांशी संवाद साधताना अब्दुल सत्तार यांनी अजित पवारांबाबत बोलताना चांगलीच टोलेबाजी केली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे राहून डोळा मारलेला अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं होत. सत्तार यांनी देखील याबाबत मिश्किल टिपण्णी केली आहे. ज्यांचं वय डोळे मारायचे आहे ते डोळे मारतात, ज्यांनी लहानपणी डोळे मारले नाहीत, ते आता मारत आहेत असा टोला यावेळी सत्तार यांनी लगावला.
तुम्ही गौतमी पाटीलला ओळखता का ? असा सवाल सत्तार यांना विचारला असता ते म्हणाले,”कृषी महोत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. आता पुन्हा एकदा आम्ही गौतमीचा कार्यक्रम ठेवू आणि त्या कार्यक्रमाला अजित पवार यांनाही बोलावू” असं सत्तार यावेळी म्हणाले.
अजित पवारांनी देखील गौतमी पाटीलवर केलं होत भाष्य
गौतमी पाटीलने बैलासमोर नृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात देखील याच व्हिडिओची चहरचा आहे. अजित पवार यांना देखील माध्यमांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले,” ‘तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय.” अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली होती.