लाॅकडाऊनमुळे वेळेचा सदुपयोग…(बोला बिनधास्त)

काही दिवसांपासून कोरोना या प्राणघातक विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले असून भारतातील सध्याची परिस्थिती चिंतेची आहे. वृत्तपत्र ,वृत्तवाहिन्या, डिजिटल सिसटीम सर्वत्र फक्त कोरोना हा एवढाच विषय असून दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या प्राणघातक विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधानांनी 22 मार्च हा दिवस जनता करफयू घोषित केला आणि परिस्थिती लक्षात घेऊन 24 मार्च – 14 एप्रिल पर्यत लाॅकडाऊन केले. 1 आठवडा नाही ,15 दिवस नाही , तर चक्क 21 दिवस घरात राहायचे.

या दिवसांना सामोरे जावे लागले असा विचार सुद्धा केला नव्हता. नियमांचे पालन केले तरच पुढचा दिवस पाहता येईल. संपूर्ण दिवस घरात बसून करायचे काय? रोज टी.व्ही ,मोबाईल पाहून कंटाळा आला शेवटी कळाले आपण या लाॅकडाऊनमधील दिवसांत काहीच करत नाहीये,म्हणून कंटाळा येतोय.क्षणातच रोजच्या बिझी शेडयुलमुळे ज्या गोष्टींसाठी वेळ मिळत नव्हता, त्यांची यादी काढली.घरातील व्यक्तीशी संवाद साधण्याची , त्यांना समजून घेण्याची, एकमेकांच्या विचारांना प्रेरणा मिळाली हे सर्व लाॅकडाऊनमुळे झाले.

जुन्या आठवणींना उजाळा दिला.जुन्या गोष्टी ,फोटो हे सर्व पाहून चेहर्यावर हास्य आले ते इतरत्र अनुभवता येणार नाही. रोजच्या धावपळीमुळे पेपरमधील फक्त हेडलाइन वाचून घ्यायचोत,या दिवसांत संपूर्ण पेपर वाचण्यासाठी वेळ मिळाला,वाचनाची आवड निर्माण झाली. “वाचण्यासाठी वाचायचयं”या विचाराला लाॅकडाऊनमुळे प्रेरणा मिळाली. इंटरनेटचा पुरेपूर वापर करून नवनवीन स्कील शिकण्यास प्रवृत्त केले. रोजच्या धावपळीचया जीवनाला लाॅकडाऊने आराम दिला. परिस्थितीनुसार स्वत: ला जुळवून घ्यायचे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणेे अभ्यासले. प्रत्येक संकटांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर संकट काहीतरी नवीन शिकवून जात असतं, परिस्थितीत बदल झाला नाही तर; मनस्थितीत बदल करायचा आहे.कोरोना विषाणूमुळे जे लाॅकडाऊन केले ,त्यावर असे म्हणावेसे वाटते की

एक विषाणू येतो
आपपसांमधील भांडणे थांबवितो
आपुलकीचे नाते निर्माण करतो
आत्म परिक्षणाची संधी देतो
जुन्या आठवणींना उजाळा देतो
त्याला शाप म्हणावे की वरदान.

– प्रियांका निवडुंगे,
कॉलेज रिपोर्टर,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,
तळेगाव दाभाडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.