Watermelon Cultivation In Jalgaon : खानदेशात शेतकऱ्यांची कलिंगड लागडवडीची लगबग सुरु आहे. डिसेंबर महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. रब्बीमधील या कलिंगडाच्या लागवडीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ चोपडा, यावल, मुक्ताईनगर आहेत.
जळगाव व धुळ्यात मिळून सुमारे 600 हेक्टरवर कलिंगडाचे पीक आहे. नंदुरबारात मागील हंगामात सुमारे250 हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली होती. परंतु यंदा तेथील लागवड सुमारे 150 हेक्टरने कमी झाली आहे. खानदेशातील एकूण क्षेत्र मागील हंगामात सुमारे 700 हेक्टर एवढे होते. यंदा हे क्षेत्र 700 हेक्टरवरच स्थिर आहे.
कलिंगडाचे पीक नाजूक व अधिक श्रमाचे आहे. त्यात दैनंदिन विद्राव्य खते, आवश्यकतेनुसार एक दिवसाआड फवारणी घ्यावी लागते. शेतकऱ्यांनी आपल्याकडील जलसाठ्याच्या उपलब्धतेनुसार कलिंगडाची लागवड केली आहे.