पुणे कॅन्टोन्मेंट भागातही पाण्यासाठी वणवण

अनियमित तसेच कमी दाबाने पुरवठा

पुणे – शहरातील इतर भागांबरोबरच कॅन्टोन्मेंट भागामध्येदेखील पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. परिसरातील अनेक भागांमध्ये अनियमित तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील मोदीखाना, कुंभारबावडी, भीमपुरा, बाबाजान चौक, गवळीवाडा याबरोबरच खडकी कॅंटोन्मेंट परिसरातही पाणीटंचाई निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी दोन-तीन दिवस पाण्याचा पुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. इतकेच नव्हे, तर या भागांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात पाणी पुरवठा करण्याची मुख्य जबादारी महापालिका प्रशासनाची आहे. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि महापालिका या दोन्हींमधील समन्वयाच्या अभावामुळे लष्कर परिसरात नेहमीच पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. सध्या पाणीसाठ्याची स्थिती खालावली असताना परिसरातील नागरिकांना ही समस्या तीव्रतेने जाणवत आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने पावले उचलून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी टॅंकरची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)