पुणे – बसेसला मार्गफलक नसल्यास चालक आणि वाहकाला दंड

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसना मार्गफलक नसल्यास चालक आणि वाहकाला दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बसेस आहेत. यातील मार्गांवर धावणाऱ्या बसेसना पुढील आणि मागील बाजूस मार्गफलक नसल्याने प्रवाशांना बस नेमकी कोणत्या मार्गावर धावणार आहे हे समजत नाही. त्यामुळे वारंवार प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी फलका समोरील लाईट बंद असल्याच्या देखील तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या पाहणीमध्ये लाईटस बंद असल्याचे समोर आले.

पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी प्रमुख तपासणीसांची बैठक घेऊन मार्ग फलकांबाबत सूचना केल्या आहेत. यानुसार बसच्या पुढे आणि मागील दरवाजाजवळ मार्ग फलक नसणे, फलकाला विद्युत व्यवस्था नसल्यास चालक, वाहक आणि ठेकेदाराची बस असल्यास संबंधित ठेकेदाराला एक हजार रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याने पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.