ईव्हीएम’मध्ये छेडाछेड मुद्दा खरा आहे तर विरोधकांनी..– स्वरा भास्कर

नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालाला केवळ एक दिवस शिल्लक राहिलेले असताना “ईव्हीएम’मध्ये छेडाछेड केली गेल्याचे वृत्त पसरल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली. एकीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगची तातडीने भेट घेतली आणि मतमोजणीपूर्वी निवडक मतदान केंद्रांमधील “व्हीव्हीपॅट’मधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहेत तर बॉलिवूड कलाकारांकडून सुद्धा सोशल माध्यमांमध्ये ईव्हीएम मुद्यावर निषेध केला जात आहे. अशातच भारतीय जनता पक्षावर प्रखर टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत “ईव्हीएम’ छेडाछेड मुद्यावर आपले मत मांडले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने “ईव्हीएम’ छेडाछेड मुद्यावर विरोधी पक्षांना ट्विटद्वारे प्रश्न विचारला आहे की,’जर ईव्हीएम’मध्ये छेडाछेड झाल्याचे खरे आहे तर विरोधी पक्षाचे नेते कोर्टात का जात नाही?..किंवा यात दुसरे काही गुपित आहे.’या ट्विटद्वारे स्वरा भास्करने विरोधी पक्षातील नेत्यांना प्रश्न विचारला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×