Lok Sabha Election 2024 – महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा सुरुच आहे. काही जागांवर अजूनही एकमत झालेले नाही. आज वादग्रस्त जागांवर तोडगा काढण्यासाठी निर्णायक बैठक होणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मंगळवारी (दि. 26 मार्च) रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे, खासदार संजय राऊत यांनी याबाबत संकेत दिले. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या या पहिल्या यादीत एकूण 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असू शकतो.
उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मविआची आज निर्णायक बैठक –
उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची आज संध्याकाळी पाच वाजता निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत मविआचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. ज्या जागेवर दोन तीन पक्षांनी दावा केला आहे अशा वादग्रस्त जागांवर या बैठकीत ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार –
1. दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2. उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर
3. उत्तर पूर्व मुंबई – संजय दिना पाटील
4. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई
5. रायगड – आनंद गीते
6. रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत
7. ठाणे- राजन विचारे
8. धाराशिव- ओमराजे निंबाळकर
9. परभणी -संजय जाधव
10. सांगली – चंद्रहार पाटील
11. मावळ- संजोग वाघेरे
12. शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
13. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
14. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
15.छत्रपती संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
16. यवतमाळ वाशिम संजय देशमुख