ICC Mens T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्येही चाहत्यांमध्ये मागील आयपीएलप्रमाणेच तोच उत्साह आणि तोच जोश पाहायला मिळत आहे. यांच उदाहरण म्हणजे आयपीएल 2024 चे पहिले 10 सामने डिस्ने स्टारवर सुमारे 35 कोटी यूजर्संनी पाहिले आहेत, जो स्वतःच एक रेकॉर्ड बनला आहे. त्याच वेळी, हंगामातील पहिल्या 10 सामन्यांमध्ये प्रेक्षकांनी सामने पाहण्यासाठी घालवलेल्या वेळेत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या लीगनंतर चाहत्यांना टी-20 वर्ल्ड कपचा आनंद लुटता येणार आहे. जूनमध्ये टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. याआधी भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने मोठी भविष्यवाणी केली होती. T20 विश्वचषकात भारतासाठी कोणता खेळाडू गेम चेंजर ठरेल हे त्याने सांगितले आहे.
युवराजने 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तथापि, आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने गेम चेंजर्स म्हणून हार्दिक पांड्या किंवा जडेजा आणि रिंकूचे नाव घेतले नाही. तर युवराजने चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचे नाव घेत त्याचा संघात समावेश करण्यास सांगितले आहे.
युवराजने फॉर्मात असलेल्या 30 वर्षीय शिवम दुबेचे कौतुक केले आहे. युवराजने ट्विटरवर लिहिले की, शिवमची चालू आयपीएलमधील फलंदाजी पाहून आनंद झाला. तो सहज षटकार मारतो. मला वाटतं की, तो भारताच्या विश्वचषकाच्या संघात असावा. त्याच्यात गेम चेंजर होण्याची क्षमता आहे.
IPL 2025 : पंड्याच्या नेतृत्वावर नाराज; पुढील मोसमात रोहित शर्मा अन्य संघाकडून खेळणार..?
दरम्यान, शिवम या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शुक्रवारी सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 24 चेंडूत 45 धावांची शानदार खेळी केली. शिवम दुबेने 2 चौकार आणि 4 षटकार मारले. शिवम दुबेने आतापर्यंत आयपीएल 2024 मध्ये चार डावात 49.33 च्या सरासरीने आणि 160.86 च्या स्ट्राईक रेटने 148 धावा केल्या आहेत.