Veerappan Daughter Vidya Rani । चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी विद्याराणी हिने राजकारणात उडी घेतली. त्या तमिळनाडूतील कृष्णगिरी या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांना नाम तमिझार काची (एनटसी) या पक्षाने तिकीट दिले आहे. । Veerappan Daughter Vidya Rani
वीरप्पन याने अनेकांची हत्या केली होती. अनेकांची हत्या केल्यानंतर तो त्यांच्या शिरासोबत फुटबॉल खेळत होता. त्याला 18 ऑक्टोबर, 2004 मध्ये ठार करण्यात आले होते. आता त्याची मुलगी विद्याराणी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. विद्याराणी या व्यवसायाने वकील आहेत.
एनटीसी पक्षाने तमिळनाडूत एकूण 40 उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या 40 उमेदवारांत अर्धे उमेदवार महिला आहेत. यात विद्या राणी यांचाही समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्या राणी या राजकारणात सक्रिय आहेत.
कोणत्या पक्षाकडून उमेदवारी?
विद्या राणीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच तिने भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर विद्या राणीने अभिनेता आणि दिग्दर्शक सीमान यांच्या नाम तमिलर काची (एनटसी) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता एनटीकेने विद्या राणी हिला कृष्णागिरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
विद्या राणीची वडिलांसोबत एकदाच भेट –
विद्या राणी ही आपले वडील वीरप्पन यांना आयुष्यात एकदाच भेटली होती. विद्या राणी तिसरीत शिकत होती तेव्हा त्यांची भेट झाली होती. तामिळनाडू-कर्नाटक सीमेवर गोपीनाथम येथे त्याच्या आजोबांच्या घरी ही भेट झाली होती. । Veerappan Daughter Vidya Rani
विद्या राणी नेहमी म्हणते की, तिच्या वडिलांनी जो मार्ग निवडला होता तो चुकीचा होता. मात्र, असे असले तरी त्यांनी नेहमी गरिबांचा विचार केला. माझ्या वडिलांना जनतेची सेवा करायची होती पण त्यांनी त्यासाठी निवडलेली पद्धत चुकीची होती. आता मी जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आली आहे.