World Cup 2023 Team Pakistan : विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघानं 5 सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणाजे अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या22व्या सामन्यात पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला. या विश्वचषकातील हा तिसरा मोठा उलटफेर ठरला.
दरम्यान, याआधीच्या दोन सामन्यांत पाकिस्तान संघाचा पराभव झाला. भारतानंतर ऑस्ट्रेलियानेही त्याचा पराभव केला आहे. त्यातच अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडू देखील त्यांना ट्रोल करत आहेत.
अफगाणिस्तानकडून झालेला लाजीरवाणा आणि एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीवर त्यांचा माजी कर्णधार वसीम अक्रमने संताप व्यक्त केला आहे. या कामगिरीसाठी त्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांना जबाबदार धरले असून वशिल्याचे खेळाडू खेळवल्याचाच हा परिणाम असल्याचे मत अक्रमने व्यक्त केले आहे.
#CWC2023 #PAKvAFG : विश्वचषकात आणखी एक मोठा उलटफेर, अफगाणिस्तानचा पाकवर सनसनाटी विजय…
पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझमच्या हाती देताना त्याला आपण कसा संघ देत आहोत याचा विचार व्हायला हवा होता. पराभूत मानसिकतेचे खेळाडू संघात आहेत. त्यांची कामगिरीही सुमार होत आहे. त्यांना संघात निवडताना कोणता निकष लावला गेला हेच समजत नाही. मंडळाचे अध्यक्ष अश्रफ यांच्या पसंतीचेच खेळाडू संघात खेळवले जात आहेत. संघाकडे व नेतृत्वाकडे कोणतीही दिशा व आराखडा नाही. सलग तीन पराभवांतून खेळाडू काहीही शिकलेले नाहीत. ज्यांच्यावर सर्वात जास्त भिस्त होती ते बाबरसह महंमद रिझवान व शाहीन शाह आफ्रिदी हेच निराशाजनक कामगिरी करत आहेत, असेही अक्रम म्हणाला.
#CWC2023 #PAKvAFG : “हा पाकचा संघ पाहून…”,अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर ‘शोएब अख्तर’ संतापला
विश्वकरंडक स्पर्धेत आपण खेळत आहोत तसेच ही स्पर्धा चार वर्षांनी एकदा होते, त्यात आपली कामगिरी कशी झाली पाहिजे याचे भान सध्याच्या पाकिस्तान संघाला नाही. एकसंधपणे कामगिरी दिसत नाही कारण संघात समतोलच नाही. वरिष्ठ खेळाडूंचे नवोदितांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. मात्र, या संघातील सगळेच भरकटल्यासारखे खेळत आहेत. प्रत्येक सामन्यासाठी प्रत्येक संघाच्या योजना असतात, नियोजन असते तिथेच पाकचा संघ कमी पडत आहे, असेही अक्रम म्हणाला.