नवी दिल्ली – भारत आणि जपान यांच्यातील जपान-भारत सेमीकंडक्टर पुरवठा साखळी भागीदारीसंदर्भात जुलैमध्ये झालेल्या सहकार्य कराराबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली.
उद्योग आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी सेमीकंडक्टरचे महत्त्व ओळखून सेमीकंडक्टर पुरवठा साखळी वाढवण्याच्या दिशेने भारत आणि जपानमधील सहकार्य बळकट करण्याचा सहकार्य कराराचा उद्देश आहे.
या सहकार्य करारावर उभय देशांच्या स्वाक्षरी होईल, त्या तारखेपासून या कराराची अंमलबजावणी सुरू होणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी हा करार लागू राहील.
या कराराच्या माध्यमातून अत्याधुनिक लवचिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आणि पूरक सामर्थ्यांचा लाभ घेण्यासाठी जी2जी आणि बी 2बी दोन्ही संधींवर द्विपक्षीय सहकार्य राहणार आहे. या सहकार्य करारामध्ये सुधारित सहकार्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.