अफगानिस्तानातील रणरागिणी! केशराच्या राणीचे तालिबान्यांना आव्हान

कोणत्याही परिस्थितीत केशर निर्मिती उद्योग सुरूच ठेवण्याचा निर्णय

काबुल: अफगाणीस्थान मध्ये तालिबान्यांची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर तेथील उद्योगपतींना आणि त्यांच्या व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. पण अफगाणिस्तानमध्ये अशी एक महिला उद्योगपती आहेत जिने तालिबान्यांना थेट आव्हान देऊन आपला केशर निर्मीतीचा उद्योग चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अफगाणीस्तानमधील हेरान प्रांतात राहणारी शफिकआई हटाई ही 40 वर्षीय महिला केसर निर्मिती उद्योगात कार्यरत असून संपूर्ण जगात तिचे केशर निर्यात केले जाते. तालिबान्यांचे महिला विषयक धोरण सकारात्मक नसल्याने शाफिकाईचा हा मोठा बिझनेस धोक्यात येणार की काय अशी शंका निर्माण झाली होती, पण कोणत्याही परिस्थितीत आपला व्यवसाय चालूच ठेवण्याचा निर्णय तिने घेतला आहे. देशातील केशर निर्मिती व्यवसायातील ती एकमेव महिला उद्योजक असून तिच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व महिलाच आहेत.

तिने 2007 मध्ये आपल्या कंपनीची स्थापना केली होती. साठ एकर क्षेत्रामध्ये केशराची लागवड करून प्रक्रिया करून ते जगभरात निर्यात करण्याचा व्यवसाय तिने सुरू केला होता. तिच्या या व्यवसायाला गेल्या काही वर्षांमध्ये चांगले यश मिळाले होते पण आता अफगाणिस्तानमधील तालिबान यांची राजवट आल्याने महिलांनी चालविलेला हा व्यवसाय चालू राहणार की नाही याबाबत शंका वाटत होती. पण कोणत्याही परिस्थितीत हा व्यवसाय चालूच ठेवण्याचा निर्णय शफिकआईने घेतला आहे.

31 राज्यांमध्ये तब्बल 6 हजार एकर क्षेत्रामध्ये केशराची लागवड केली जाते आणि या क्षेत्रामध्ये दरवर्षी सहा हजार किलो पेक्षा जास्त केशर उत्पादित केले जाते जगाच्या कानाकोपऱ्यात या केशराची निर्यात केली जाते.

एका किलोला चार लाख रुपयांपर्यंत असतो केशराच्या गुणवत्तेप्रमाणे हा भाव कितीही असू शकतो. दुर्गम भागात अनेक ठिकाणी अफूची शेती केली जाते पण गेल्या काही वर्षांमध्ये केशराच्या शेतीमध्ये मिळणारा पैसा लक्षात घेऊन अनेक लोकांनी अफूची लागवड सोडून केशराची लागवड सुरू करण्यास प्रारंभ केला आहे.शाफिकाने आपल्या कंपनीच्या माध्यमातून एक हजारापेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळवून दिला असल्याने तिला हा व्यवसाय बंद करण्याची इच्छा नाही, त्यामुळे कितीही तालिबान्यांचा विरोध झाला तरी आपली ही कंपनी चालूच राहील असे तिने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.