नवी दिल्ली – आषाढीला पंढरपुरला जाऊन पांडुरंगाचे दर्शंन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. केव्हा एकदा विठुरायाचे दर्शंन घेतो आणि डोळेभरुन बघतो, अशी भावना प्रत्येकाची असते.याच भावनेतून राजधानीत स्थायीक झालेले मराठी वासीयांनी आषाढी सोहळयानिमीत्त वारीचे आयोजन दिल्लीत केले होते.
दिल्लीकर मराठीजनांनी दिल्लीतच आषाढी एकादशीनिमीत्त सांकेतिक वारी सोहळा आयोजित करण्याची परंपरा सुरु केली आहे. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने पहाटे सहा ते सकाळी दहा या वेळेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
हातात टाळ..डोक्यावर पांढरी टोपी.. मुखाने राम कृष्ण हरी.. जय हरी विठ्ठलाचा जप करीत दिल्लीकर मराठीनीं राजधानीत महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले. सकाळी सहा वाजल्या पासून सुरु झालेल्या वारी मध्ये महाराष्ट्रीयन नऊवारी नेसलेल्या स्त्रिया…पांढरे धोतर नेसलेले पुरुष मंडळी आणि अस्सल मराठी वेशभूषे तील बच्चे कंपनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती,हे विशेष. कॅनॉट प्लेस येथील प्राचीन हनुमान मंदिरातुन सुरु झालेल्या वारीचा समारोप आर के पुरम येथील विठ्ठल मंदिरात करण्यात आला.
विठ्ठल मंदिरात देखील भाविकांनी दर्शन तर घेतलेच शिवाय फुगडी देखील खेळले. कीर्तन… भजन… फुगडी.. यामुळे आपण आज दिल्लीत राहतोय…. हे विसरून पंढरपूरच्या पांडुरंगा च्या भक्तीत तल्लीन झालेले भाविकामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.
दिल्लीतील हनुमान मंदीर कॅनॉट प्लेस पासून सुरु झालेली वारी आरकेपुरम येथील विल रुकिमीनी मंदीरात समारोप झाला. नाचत गात विठुनामाचा गजर करीत गुडगाव, दिल्ली ,नोएडा येथील मराठी नागरिक मोठया संख्येने वारीत सहभागी झाले होते. यासाठी दिल्ली मराठी प्रतिष्ठान अनेक मराठी सोहळे दरवर्षीं असेच उत्साहात साजरे करतात. यामुळे मराठी नागरिकांचा उत्साह देखील वाखाण्ण्याजोगा असतो, हे महत्वाचे.